जीवन त्यांना कळले हो
जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो कळले हो कळले हो
जलापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
चराचाराचे होऊनी जीवन स्नेहसां पजळले जीवन त्यांना कळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनावर घन होऊनी जे वळले हो जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्राने वैभव ज्यांनी तुळीले हो
सायासाविण ब्रम्ह सनातन घरीच ज्या आढऴले हो
उरीच ज्या आढऴले हो ________________
गीतकार : बाकीबाब बोरकर (बा. भ. बोरकर)
संगीत : भानुकांत लुकतुके स्वर : श्यामा चित्तार व कैलाशनाथ जैस्वाल

Comments

Popular posts from this blog

त्या दिसा वडा कडेन

मालवणी कविता

तुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो