मालवणी कविता- घरां मातीची होती पन भावबनकी जिवाभावाची होती.

'मकान सारे कच्चे थे' या हरीवंशराय बच्चन यांच्या एका गाजलेल्या कवितेच्या मालवणी अनुवादाचा एक प्रयत्न 🙏🙏🙏
घरां मातीची होती
पन भावबनकी जिवाभावाची होती.
एक्या बाकड्यार बसत
पन लागी लागी असत.
सोफे आणि डबलबेड इले
घरातलेपन भायरे झाले.
वसरेर आता बसनत नाय
गजालीपन होनत नाय.
खळ्यामेरेन झाडा होती
सुखादुखात वांगडान रडा होती.
दाराची फाळका उघडीच रवत
वाटेवयल वायच येवन बसत.
कावळ्यांच्या आराडण्यान
पावणे येत नी जायत.
घरात एकच सायकल होती
कोनव घेती नी खयव जाती.
नाती गोती जिती होती
कट्टी बट्टी सदची होती.
पैशेआडके नाय होते
कपाळार आठयेय नाय होते.
घरा मातीची होती
पन भावबनकी जिवाभावाची होती.
आता वाटता लय कमावला
पन कळाना किती गमावला.
आयुष्याच्या धावपळीत काळान काळो रंग भरलो.
हसत्या खेळत्या जीवनातलो आनंद केवाच सरलो.
त्या काळात सकाळी हसत हसत उठायचव
आता मात्र आमी हसाकच इसारलंव.
नातीगोती संभाळत आता कीती लांब इलंव
सगळ्यांका संभाळताना स्वतापासून भायरे झालंव...

स्वैर अनुवाद-रत्नकान्त नाईक.
ठाणे.

Comments

Popular posts from this blog

त्या दिसा वडा कडेन

मालवणी कविता

तुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो